.
नांदेड - एकाच कुटुंबातील आठ सदस्य कोरोना पाझिटिव झाले होते.ते सर्व अत्यंत भीतीच्या छायेत होते. अशांना भयमुक्त करण्याचे पवित्र कार्य श्री कृष्णा हॉस्पीटल नांदेड चे संचालक डॉक्टर राम मदने यांनी केले आहे.
कुटुंबातील कोरोना ग्रस्ताना त्यांच्याच घरी वैद्यकीय सेवा पुरवून कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना मुक्त करण्याचे कार्य डॉक्टर राम मदने यांनी केले आहे.
कोरोना मुक्त झाल्यानंतर त्या सदस्यांनी डॉक्टर राम मदने साहेब यांना पुष्पगुच्छ व फळे देवून आभार मानले.
याविषयी सांगताना डॉक्टर मदने साहेब म्हणाले की "हा प्रसंग माझ्या साठी अत्यंत ह्दय-स्पर्शी आहे कारण रोग्यांची सेवा करणे हा आमुचा धर्म आहे पण यांनी आम्हाला पुष्पगुच्छ व फळे देवून माझा व माझ्या सहकारी यांचा जो गौरव केला.हा माझ्या साठी मी फार मोलाचा पुरस्कार समझतो."
कोरोना सारख्या भयानक संकटावर मात करून एका कुटुंबाला नवजीवन दिल्या बद्धल समाजातील सर्व स्तरातून डॉक्टर राम मदने व त्यांच्या सहकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
COMMENTS