नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
.....दि.१५ ऑक्टोबर राष्ट्रीय महिला शेतकरी दिनानिमीत्त मुखेड तालुक्यातील मौ. आंबुलगा (बु) येथे तालुका कृषि अधिकारी कार्यालय,मुखेड मार्फत नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प अंतर्गत महिला शेतकरी कार्यशाळे चे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळे मध्ये महिला शेतकरी तसेच गावकय्रांना कृषि विभागाच्या POCRA,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटीका योजना या विषयांवर कृषि सहाय्यक श्री.हणुमंत टोकले सर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच SMART,विकेल ते पिकेल या विषयांवर कृषि सहाय्यक श्री.गणेश पिटले सर यांनी संवाद साधला तर नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पाचे समुह सहाय्यक श्री.विश्वनाथ पचरंडे यांनी महिलां साठी POCRA अंतर्गत गटशेती व शेती आधारीत उद्योग या विषयांवर संवाद साधला....कार्यक्रमाचे सुञसंचालन कृषि पदवीधर युवाशक्ती संघटनेचे नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष तुकाराम मंञे यांनी केले.
कार्यक्रमासाठी उपसरपंच श्री.विनोद गोवींदवार,पोलीस पाटील विठ्ठलराव कौरवाड,कृषि पदवीधर युवाशक्ती संघटने चे मुखेड तालुका उपाध्यक्ष निलेश नागमवाड, महिला बचत गटाच्या सौ.मोतेवार ताई, मांजरमे ताई तसेच उमेद प्रकल्प समन्वयक व शेतकरी महिलांची उपस्थिती होती...कार्यक्रमाचे आयोजन सोशल डिस्टनसिंग व कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करुन केले गेले.
COMMENTS