धर्माबाद (अहमद लड्डा) मराठवाडा विभागातील नांदेड़ जिल्ह्यात परतीच्या पावसाने सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याबद्दल हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान तात्काळ द्या अशी मागणी पी जी कोटुरवार जिल्हा अध्यक्ष मराठवाड़ा विद्यार्थी संघटना नांदेड़ यांनी केली आहे.
गेल्या 10 वर्षात वारंवार दुष्काळ परिस्थितीला मराठवाड्यातील शेतकरी वर्गाला सामोरे जावे लागले कधी नाही या वर्षी निसर्गानी कृप केली व मराठवाड्यातील शेती मालाचे यावर्षी भरघोस पीक आहे मराठवाड्यातील शेतकरी वर्ग आनंदी होता तसेच हाताला काम मिळेल यामुळे सर्वसामान्य शेतमजूर ही आनंदी होता यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतमजूर ने ऊसतोडणी व वीटभट्टी ची उचल घेतली नाही. व सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार तरुणही शेती मध्ये मग्न राहिला कारण कोरोनाच्या महामारीत त्याला मुंबई, पुणे सारख्या शहरातील रोजगार बंद झाला होता. त्यामुळे मराठवाड्यातील तरुणही आपल्या शेतकरी बापाच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबत होता कापूस. सोयाबीन. तूर. माका. ऊस. कधी नव्हे असे प्रचंड पीक आले होते. पण परतीच्या पावसामुळे एका रात्रीत होत्याच नव्हतं झालं. यावर्षी मुलीच लग्न मुलाच्या शिक्षणाचा व छोटी मोठी स्वप्न पाहणारा शेतकरी बाप हताश झाला कारण उधारीने आणलेल्या बी बियाणांचे पैसे कसे फेडावे हा एक मोठा प्रश्न उभा होता मराठवाड्यातील शेतकरी पुनः आत्महत्या करण्याच्या मार्गापासून वाचवायचा असेल तर तुमची पोपट पंची सोडून प्रत्यक्ष रोख स्वरूपात आर्थिक मदत करावी अन्यथा सत्ताधारी पक्ष असो वा विरोधी पक्ष च्या नेत्यांना मराठवाडा विद्यार्थी संघटना (mso)मराठवाड्यातील 8 ही जिल्ह्यात येणाऱ्या काळात पाऊल टाकू देणार नाही याची गंभीर पणे नोंद घ्यावी. असे निवेदन मा. मुख्यमंत्री यांना धर्माबाद चे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
COMMENTS