-----------------
नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
दुबार अतिवृष्टीने मुखेड - कंधार
मतदारसंघातील मुखेड कंधार तालुक्यात खरीप पिकाचे अथोनाथ नुकसान झाले.त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.मुखेड -कंधार मतदारसंघात पंचनामे न करता.
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसगट एकरी 25 हजार अनुदान देण्याची मागणी आ.डॉ. तुषार राठोड साहेब यांनी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार यांचेकडे केली.
नामदार वडेट्टीवार हे अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी नांदेडहुन लातूरकडे जात असतानाच आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सलगर तालुका मुखेड येथे धावता ताफा थांबवून सलगर फाटा ता.मुखेड येथील शेतकरी यांच्या शेतात जाऊन ना.विजय वडेट्टीवार यांनी पाहणी केली असता शेतकऱ्याचे अथोनाथ नुकसान झाल्याचे आमदार डॉ. तुषार राठोड साहेब यांनी सांगितले.. आ. डाॕ.तुषार राठोड यांनी शिष्टमडळासह भेट घेवून शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरभाईची मागणी केली.
यावेळी तहसीलदार काशीनाथ पाटील,नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, प.स. सभापती प्रतिनिधी लक्ष्मण पाटील खैरकेकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड,
भा.ज.पा.तालुकाध्यक्ष डॉ. विरभद्र हिमगिरे, किशोरसिंह चौहान, प.स.सदस्य राम पाटील, सलगरचे सरपंच उद्धव पाटील व्यंकट समराले, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS