नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय मान्यता प्राप्त मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनद्वारे अल्पसंख्यांक समाजातील मुलींना बेगम हजरत महल शिष्यवृत्तीसाठी आनलाईन अर्ज मागवणे सुरु आहे . अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थिनींनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा कार्यकर्ते तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मुखेड चे कार्याध्यक्ष आसद बल्खी यांनी केले आहे . मुस्लिम , बौद्ध , शीख , पारशी , जैन व इसाई या अल्पसंख्यांक समाजातील मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून बेगम हजरत महल शिष्यवृत्ती इयत्ता ९ वी ते १२ वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती दिली जाते . या शिष्यवृत्ती अंतगर्त ९ वी व १० वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना वार्षिक ५ हजार रुपये तसेच इ . ११ वी व १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते . शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज मागवणे सुरु आहे अर्ज दाखल करण्याची शेवटची ३१ ऑक्टोबर २०२० आहे . अर्ज दाखल करण्यासाठी http ://bhmnsmaef.org/ maefwebsite / या संकेतस्थळावर भेट द्या किंवा आपल्या शाळेच्या मुख्याधिपकांशी संपर्क साधा . अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड कार्याध्यक्ष आसद बल्खी यांनी केले आहे .
COMMENTS