*महाराष्ट्र शेतकरी शुगरच्या गैरकारभारामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार* *तत्कालीन चेअरमन अभिजित देशमुख यांनी हात झटकले*

परभणी/सिद्धेश्वर गिरी सोनपेठ तालुक्यातील एकमेव खासगी साखर कारखाना म्हणून महाराष्ट्र शेतकरी शुगरकडे पाहिल्या जाते.मात्र याच महाराष्ट्र शेतकरी...


परभणी/सिद्धेश्वर गिरी


सोनपेठ तालुक्यातील एकमेव खासगी साखर कारखाना म्हणून महाराष्ट्र शेतकरी शुगरकडे पाहिल्या जाते.मात्र याच महाराष्ट्र शेतकरी शुगरचे तत्कालीन चेअरमन अभिजीत देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिला पोटीचे देयके अदा केले नसल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी अटक झाली होती. त्याचबरोबर बँकेकडून कारखान्याच्या नावावर उचललेले कर्ज भरणा केलले नसल्यानेही त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आल्याचे दिसून येते.मात्र कारखान्यावर असणारा कर्जाचा डोंगर आणि बँकेची जप्तीची कारवाई यामुळे बँक प्रशासन आणि अभिजीत देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या नशिबाशी नवा खेळ खेळून लातूर जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याच्या साखर कारखानदारीला पोषक वातावरण निर्मिती करून हा साखर कारखाना विक्री करावयास भाग पाडले असल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.नाव बदलून शेतकऱ्यांची पुन्हा फसवणूक होणार का?असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.मात्र ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून कारखान्याची विट उभी करण्यासाठी पैसा दिला.त्या शेतकऱ्यांचे बेहाल होताना यातून दिसून येत आहे.जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये परभणीला अपयश आल्याचे उदाहरणे ताजी असतानाच"भर अब्दुल्ला गुड थैली में"असा प्रकार अभिजीत देशमुख यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे.यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर नवीन मालकाच्या डोळ्यात आनंदाश्रू येत असल्याचे दिसून येत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,कारखाना उभारणीवेळी अभिजीत देशमुख यांनी शेतकऱ्यांना आम्ही तुम्हाला पैसाही देऊ!आणि शेअर्सही देऊ!असे आमिष दाखवून परभणी येथील आंध्रा बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आंध्रा बँकेतुन शेतकऱ्यांच्या नावे विड्रॉलसह खाते उघडण्यासाठी लागणारा प्रस्ताव आणून त्यावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्‍या घेऊन पैसे काढले आहेत!असा प्रकार बहुतांश शेतकऱ्यांसोबत झाल्याचे उदाहरणे दिसून येत असल्याने साखर कारखान्यावर सदर शेतकऱ्यांनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता जुन्या मालकाला बोला आमचा काही संबध नाही अशी उत्तरे देण्यात आल्याने कर्जबाजारी शेतकऱ्यांसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज उचलायचे आहे.त्यांच्या सिव्हील रिपोर्टवर आंध्रा बँकेतून कर्ज उचलल्याचे निष्पन्न होत आहे.यामुळे सामान्य शेतकऱ्यावर न उचललेल्या कर्जाची फेड करण्याची वेळ येण्याची शक्यता दिसून येत आहे.


*अभिजीत देशमुख यांनी केले बेताल वक्तव्य*


महाराष्ट्र शेतकरी शुगरचे तत्कालीन चेअरमन अभिजीत देशमुख यांच्याशी शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी संपर्क साधला असता.शेतकरी बुडाले तर तुमचे काय जाते? मी बुडालो तेव्हा कोणी बोलले का?असे बेताल वक्तव्य करत शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group