नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
पाणी हे एक नैसर्गिक संसाधन आहे. हे सर्व सजीव आणि मानवासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच पाणी हा मानवाच्या जीवनाचा एक मूलभूत घटक आहे.
पाणी म्हणजे जीवन. या धरतीवरील प्रत्येक सजीवांचे आणि मानवाचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. कारण कोणताही मनुष्य, प्राणी, पशु आणि पक्षी तसेच जीव – जंतू हे पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही.पण अशुद्ध पाणी असेल तर रोगराई ला निमंत्रण म्हणून शुद्ध पाणी पुरवठा ही काळाची गरज आहे असे असे प्रतिपादन मा. आ. वसंतराव पाटील चव्हाण यांनी जनता हायस्कुल येथे आयोजित केलेल्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले .
जनता हायस्कुल क. म. वि. च्या संकुलात विविध शाखेतून जवळपास सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकाचे आरोग्य सुरक्षित असावे या उद्देशाने जनता हायस्कुल च्या प्रांगणात जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य केशवराव सूर्यवंशी यांनी प्रस्ताविकातून महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमा बद्दल माहिती दिली सदरील प्रकल्पाचे नियोजन व आराखडा करून दिल्याबद्दल संस्थेचे सचिव प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांचे आभार मानले तसेच या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल एज्युकेशन सोसायटी पगारदार कर्मचारी सहकारी पत संस्थे चे अध्यक्ष यशवंत चव्हाण आणि सर्व संचालकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन प्रा उत्तम पाटील यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष वसंत मेडेवार, जेष्ठ संचालक केशवराव पा. चव्हाण, सचिव प्रा. रवींद्र पा. चव्हाण, संगमनाथ कवटिकवार ,हणमंतराव सुजलेगावकर उपस्थित होते
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ बाळासाहेब इंगळे, प्राचार्य डॉ मारुती माने, मुख्याध्यापक गंगाधर चव्हाण, उपमुख्याध्यापक सा. रा. जाधव, उपप्राचार्य प्रा प्रभाकर पवार, पर्यवेक्षक डॉ गणेश देवडे ,मधुकर सरगुले, आनंद पवार, प्रा पी डी जाधव यांच्यासह सर्व शिक्षक ,शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कोविड नियमाचे पालन करून उपस्थित होते.
COMMENTS