राम दातीर
माहूर ( प्रतींनिधी ) अवेळी झालेल्या पावसाने कापूस , सोयाबीन या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरीही प्रशासनाने निरंक अहवाल पाठवून माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोप किसान ब्रिगेडचे पदाधीकारी अविनाश टनमने यांनी केला आहे.दि.16 ऑक्टो.रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर हे माहूर दौऱ्यावर आले होते.त्यावेळी टनमने यांनी पावसाने भिजलेले सोयाबिन व कापसाचे बोंडे दाखवून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत मिळवून द्या अशी त्यांना विनंती केली.
माहूर तालुक्यात मागील 15 ते 20 दिवसा पासून सातत्याने पाऊस पडत असल्याने हाती आलेले कापूस, सोयाबीन आदि खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असल्याची व्यथा जिल्हाधिकारी महोदया पुढे कथन केली.तसेच माहूर तालुक्यात इफको-टोकियो कंपनी चे कार्यालय नाही, दोन कर्मचारी नेमले आहेत,मात्र ते कुणालाही भेटत नाहीत. त्यांचे भ्रमणध्वनी सुध्दा मागील 8 दिवसा पासून बंद असल्याच्या बाबीकडेही त्यांचे लक्ष वेधले. यावेळी शेतकरी समूहाचे विलास गावंडे,सुभाष लकडे, नरेंद्र टनमने, जियाखान पठाण, प्रदीप पतंगे, वसंतराव जाधव, सतीश चौधरी, सुनिल वानखेडे, अवधूत जाधव, बालाजी टनमने,शंकर राऊत, किसान युवा क्रांति संघटनेचे मृणाल येउतकर, प्रमोद सोनकर यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.पर्जन्यमानाचा मापदंड न लावता शेतकऱ्यांच्या मालाच्या नुकसानीचा मापदंड लावून शासनाने शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी अशी अविनाश टनमने यांनी आमच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली.
COMMENTS