दक्षिण जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा गायकवाड तर महानगराध्यक्ष पांडुरंग पोपळे पाटील यांची निवड
नांदेड, प्रतिनिधी दि. 6 -
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी प्रश्नाविषयी शासन दरबारी व प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करणारी शेतकऱ्याची हक्काची संघटना म्हणून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेकडे पाहिल्या जाते. याच अनुषगाने जिल्हाभर संघटनेचा विस्तार करण्यासाठी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या पदाच्या निवडी जाहीर केल्या असल्याची माहिती पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
यामध्ये नांदेडच्या विभागीय अध्यक्षपदी रामदास पाटील माळेगावे, जिल्हाध्यक्ष उत्तर प्रशांत आबादार, जिल्हाध्यक्ष दक्षिण ज्ञानोबा गायकवाड, महानगराध्यक्ष पांडुरंग पोपळे पाटील, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शेख रहीम वायपनकर यांची तर तालुकाध्यक्ष म्हणून नांदेड दक्षिण शेख अकबर, माहूर जयकांत मोरे, किनवट सतीश चव्हाण, हिमायतनगर पवन सूर्यवंशी, हदगाव तालुका अध्यक्ष भगवानराव कदम, विलासराव माने, भोकर शिवराज पाटील पवार, उमरी पांडुरंग जाधव, बिलोली नामदेव पाटील नरवाडे, नायगाव बळवंत मोरे, लोहा पांडुरंग पवार, कंधार गजानन वरपडे पाटील, मुखेड बालाजी पाटील लखमापूरकर, अर्धापूर पिंटू पाटील गाढे, देगलूर कपिल पाटील तडखिले यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. मुदखेड, धर्माबाद या दोन तालुक्यात लवकरच निवड करणार असल्याचं सांगितलं आहे.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी निवडीचे स्वागत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश सल्लागार विजयराव चव्हाण, धनंजय पाटील, शंकर पवार, विनीत पाटील, संदीप पावडे, दत्ता जाधव, मोतीराम पवार, श्रीकांत शिंदे, शिवशंकर थोटे, अविनाश पाटील कदम, मंगेश गवळी, गणेश शिंदे, बळवंत ताटे, विक्रम क्षीरसागर, नंदू पाटील, अनिल देवसरकर, महेश गोरेगावकर, संदीप जाधव, सुनील पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी केले आहे.
------------------------------------------------
COMMENTS