माजलगाव प्रतिनिधी
शासनाने विद्यार्थ्यांना दिलेले अन्नधान्य सिद्धेश्वर प्राथमिक विध्यालायत सहा किलो तांदूळ,दीड किलो हरभरा,दीड किलो मुगडाळ असे नऊ किलो अन्नधान्य वाटप करण्यात आले आहे.
श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयात आज मंगळवार दि.6 ऑक्टोबर 2020 रोजी गटशिक्षणाधिकारी श्री बेडसकर यांच्या हस्ते शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ सहा किलो, मूगडाळ दीड किलो आणि हरभरा दीड किलो असे एकूण नाऊ किलो अन्नधान्य वाटप करण्यात आले तर दि. 7 ऑक्टोबर 2020 रोजी इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांना व दि. 8 ऑक्टोबर 2020 रोजी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात येणार असल्याचे श्री सिद्धेश्वर प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अंबादास रोकडे यांनी सांगितले कोविड-19 चे सर्व नियम पाळून शालेय पोषण आहार योजने अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला सहा किलो तांदूळ, दीड किलो मुगडाळ आणि दीड किलो हरभरा गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव
बेडसकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक श्री अंबादास रोकडे, शिक्षक वृंद व पालक उपस्थित होते.
COMMENTS