धर्माबाद-(अहमद लड्डा)
उत्तरप्रदेशातील हाथरस येथिल एका निष्पाप मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला तिच्यावर अमानवी कृत्य करण्यात आले व दिल्ली येथे उपचार सुरू असताना मुलीचा मृत्य झाला ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून या घटनेचा तीव्र निषेध करीत दोषींना त्वरित शिक्षा देण्यात यावी अशी मागणी धर्माबाद जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिवमती सावित्रीताई सर्जेराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेखाताई कदम.प्रणीताताई ठाकरे.अनुसयाबाई बाभळे.मंदाताई पाटील. कुमारी अनुराधा बेलुरवाड उपस्थित होते
स्त्री ही कोणत्याही जाती -धर्मातील असो तिचा सन्मान केला पाहिजे कारण ती कुणाची तरी माता असते ,याप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने गांभीर्याने दखल घेऊन दोषींना लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
COMMENTS