नायगांव / प्रतिनिधी
नायगांव तालुक्यातील देगाव शिवारातील कुंटूर मायनर संरक्षण कठड्यावरील अंदाजे ३० वर्षाखालील दुतर्फा लावण्यात आलेल्या चोरीच्या मार्गाने अवैधरित्या कत्तल होत असल्याने नांदगावकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोना.शेख अब्दुल बारी,पोकॉ.विवेक ईश्वरे यांनी सापळा लावून अखेर व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
देशासह राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्शभूमीवर लाॅकडाऊनचे नियम पाळत सर्वच जनता आपआपल्या घरात बसून कोरोना व्हायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करत आहेत मात्र कुंटूर परिसरातील देगाव शिवारात कांही चोरट्या मार्गाने वृक्षाची कत्तल करणारी टोळी सक्रिय झाली असल्याने कुंटूर माणार च्या संरक्षण काठड्यावरील लावण्यात आलेल्या अंदाजे ३० वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या वृक्षांची चोरीच्या मार्गाने कत्तल केली जात असल्याने नांदगावकर यांनी दिली असल्याने पोना.शेख अब्दुल बारी व पोकॉ.विवेक ईश्वरे ,रामेश्वर पाटील यांनी सापळा लावून वृक्ष तोड करून लाकडे ट्रॅक्टरच्या साह्याने नेत असताना दोन व्यक्तीला पकडून गुन्हा दाखल करून एक ट्रॅक्टर, दोन ट्रॉली जप्त करण्यात आले आहे.
अवैधरित्या वृक्ष तोड करणारे कांही महाभाग संबंधित विभागाच्या अधिका-यांना दावणीला बांधून लाॅकडाऊनच्या काळातील सर्व नियमांची ऐसी की तैसी करून सर्रासपणे अवैधरीत्या वृक्षांची चोरट्या मार्गाने कत्तल करणे सुरू होती मात्र पोना.शेख अब्दुल बारी व विवेक ईश्वरे याच्या धाडसी कारवाई केल्यामुळे अवैधरित्या वृक्ष तोड करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
या प्रकरणी माणार प्रकल्प पाटबंधारे उपविभाग नायगांव चे ब्रह्मानंद नांदगावकर यांच्या फिर्यादीवरून गुरंन १७४ / २० कलम ३७९ /३४ भादवी सह कलम ४१,४२ भारतीय वन अधिनियम १९२७ प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक कारीमखाॅ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन व्यक्तीस अटक करून कोर्टाला हजर केले आहे.
अधिक तपास करीम पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.शेख अब्दुल बारी हे करीत आहेत
असल्याची माहिती ठाणे अंमलदार बालाजी मुंगडे यांनी दिली.
COMMENTS