*
परभणी/प्रतिनिधी
शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत शेतकऱ्यांना मदत मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा पुनरुच्चार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.यावर्षी पडलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहीजे या मताचा मी असल्याचा निर्वाळा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना त्यांनी स्मरणही करुन दिले.सोनपेठ तालुक्यातील निळा येथील नुकसानग्रस्त शेतीची पहाणी करताना त्यांनी सरकारवर निशाणा साधला यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,मागील वर्षी पडलेल्या पावसाने जेव्हा नुकसान झाले होते.तेव्हा आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी येऊन २५ हजार रुपये हेक्टरी देण्याचे आश्वासन दिले होते.त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची आज पूर्तता करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देणार आहोत.मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून सदर1नुकसान भरुन निघणे शक्य नाही मात्र सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन शेतकऱ्यांना तत्काळ बिनाअट मदत करा.अन्यथा दूरगामी परिणाम होतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने रुमने आणि चाबूक फडणवीस यांना भेट देऊन सरकारविरोधात असणारा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला.या दौऱ्यात प्रशासनाच्या वतीने चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
COMMENTS