नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
तालुक्यातील कुंटूर ठाण्यात सेवा कालावधी पूर्ण झालेल्या पोलिस कर्मचारी यांना निरोप तर नवीन रुजू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कारीमखान पठाण यांच्या शुभ हस्ते निरोप व स्वागत करण्यात आले.
सरकारी अधिकारी म्हटलं की
बदली नियुक्तीचा खेळ हा कायमचा ठरलेलाच असतो. पण पोहेकॉ. अशोक दामोदर हे पोलिस चौकी दुरक्षेत्र बरबडा येथे दिनांक ५/६/२०१५ रोजी रुजू झाल्या पासून ते ऑक्टोबर २०२० पर्यंत त्यांनी बरबडा चौकी अंतर्गत येणाऱ्या ११ गावातील जनतेला दोन कर्मचारी सोबत घेऊन योग्य प्रकारे सेवा दिली.
अंतरंगाव येथील ट्रिपल मर्डर केसमध्ये चोख कामगिरी बजावली आहे अशा अनेक प्रकरणात दामोदर यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.असून त्यांची बदली लिमगाव ठाणे येथे झाली आहे.
पोहेकॉ.अशोक दामोदर व पोना.साईनाथ सांगवीकर यांना मिळालेल्या सेवेच्या कालावधीत कुंटूर ठाण्याच्या हद्दीत केलेले काम,त्यांची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यां सोबत एकूण एकास दिलेली वागणूक..यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती
असते. असेच पोलिस कर्मचारी कुंटूर येथून बदली होऊन जाणारे निरोप मूर्ती पोहेकॉ.अशोक दामोदर (लिमगाव ) पोना.साईनाथ सांगवीकर (नायगाव),पोना तैनात बेग (कुंडलवाडी),पोना.श्रीनिवास नाईनवाड (उमरी), महिला पोलिस कर्मचारी पोना. वर्षा वायकुळे , पोकॉ.शांता शिंदे उमरी येथे बदली होऊन गेलेल्या आदी पोलिस कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला तर कुंटूर ठाणे येथे नवीन रुजू झालेले नामदेव अलगुडवाड ,नागोराव पोले , मीना रुदेवाद,माणिक जाधव ,उद्धवराव कदम ,
अशोक नारालावाड , शांता चव्हाण ,
साहेबराव गीते ,पंडित इंजळकंठे , आदी पोलिस कर्मचारी कुंटूर ठाणे येथे नव्याने रुजू झाले असून त्याचा सत्कार सपोनि.करीम पठाण याच्या हस्ते करण्यात आला आहे.
यावेळी सपोनि करीम पठाण ,दिनेश येवले,बुद्धेवाड, विवेक ईश्वरे,अशोक घुमे, अब्दुल बारी, आदींसह सर्वच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS