नायगांव / प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व जनता हा. कनिष्ठ महाविद्यालय नायगांव येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्राच्या वतीने ' माझे कुटुंब माझी जबाबदारी ' या योजने अंतर्गत कोरोना या महामारीच्या संसर्गाला प्रतिबंधात्मक उपायाची जनजागृती करण्यात येत आहे . सदर मोहीम नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. बी . के. मोहन सर व सहाय्यक कुलसचिव डॉ. चंद्रकांत पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे. कोव्हीड 19 संसर्गरोग प्रतिबंधात्मक उपायाची माहिती देणारा फलक महाविद्यालयाच्या परिसरात लावण्यात आला.या फलकाचे अनावरण केंद्रप्रमुख प्राचार्य के.जी.सुर्यवंशी सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य बाबासाहेब शिंदे , केंद्रसंयोजक प्रा. शिंपाळे जी.एम , केंद्रसहाय्यक प्रा. बैस डी.आर. , प्रा.पि.डी जाधव सर , प्रा.शिवाजी जाधव सर .प्रा.बावलगावे एम.व्ही.प्रा.मेथे टी.जी.प्रा. कुलकर्णी शरद सर. , प्रा.कासले बी.टी. , प्रा.दुड्डे नागप्पा सर व प्रा.माधव जाधव सर इत्यादी उपस्थित होते .
COMMENTS