*
धर्माबाद (अहमद लड्डा) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा 2019-2020 ह्या शैक्षणिक वर्षात धर्माबाद शहरातील नामांकित इंदिरा गांधी पब्लिक स्कूलने (E/M) यशाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी इयत्ता 5 वी मधील एकूण 10 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 6 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र ठरले असून वाघमारे सम्यक या विद्यार्थ्याने 200 गुण घेऊन प्रथम क्रमांक तर शरयू मंगनाळीकर या विद्यार्थिनीने 182 गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच इयत्ता 8 वी मधून एकूण 17 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 8 विद्यार्थी पात्र ठरले असून सितावार शैलेश या विद्यार्थ्याने 204 गुण मिळवून प्रथम क्रमांक तर मानधनी निधी या विद्यार्थिनीने 182 गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यामुळे साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ,पदाधिकारी, सदस्य आणि व्यवस्थापक श्री राज रेड्डी सर यांच्याकडून या यशाबद्दल प्राचार्य ,सर्व शिक्षक शिक्षिका आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन केले आहे .
COMMENTS