*पाहणी दौरे बंद करा...मदतमंञी मदत करा* या लक्षवेधी भावनिक घोषना दिल्या.
अन शेतकरी पुञाची प्रशासनाने घेतली धसकी
नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार) नायगांव तालुक्यात आज राज्याचे मदत व पुनवर्सन मंञी विजय वडेट्टीवार हे आले असता होटाळा शिवारात शेतीचे पाहणी करीत असतांना अचानक शेतकरी पुञ गजानन पाटील होटाळकर, चंद्रकात पाटील पवार यांच्या नेतृत्वाखाली आज विजय वडेट्टीवार यांच्या समोर शेतकरी पुञानी "बंद करा...बंद करा..पाहणी दौरे बंद करा, मदतमंञी मदत करा पाहणी दौरे बंद करा या घोषणा दिल्या. यावेळी शेतकरी पुञांनी नायगांव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा व हेक्टरी 25000 हजार मदत करावी, तात्काळ पिक विमा मंजूर करण्यात यावा. या मागणीचे मंञ्याना निवेदन सादर केले. यावेळी मा. गजानन पाटील होटाळकर व चंद्रकांत पाटील पवार यांना मदत व पुनवर्सन मंञी यांनी मदत देवु असे ऊत्तर दिले. व अशी मागणी विजय वड्डेटीवार यांच्या कडे शेतकरीपुञानी. केली यावेळी उपस्थित मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण शेतकरी पुत्र गजानन पाटील होटाळकर जिल्हा सचिव रोहित दादा पवार विचार मंच नांदेड, चंद्रकात पाटील पवार जिल्हाध्यक्ष भारतीय मराठा महासंघ नांदेड, जिवन बन, दत्तात्रय पवार, श्याम पवार, सि.एम.पवार, अशोक कंदुरके, लक्ष्मण पवार, परशुराम पवार, वसंत पवार, शरद पवार, खंडू कोत्तेवार व ईतर शेतकरी उपस्थित होते.
*वडेट्टीवारच्या दौर्यानिमित्त शेतकरी पुञाची घेतली प्रशासनाने धसकी*
आज मदत व पुनवर्सन मंञी विजय वडेट्टीवार यांच्या दौर्या निमित्त मागच्या वेळी राज्याचे कृषि मंञी दादाजी भुसे यांचा ताफा शेतकरी पुञ गजानन पाटील होटाळकर, शहाजी पा शिंदे, महेश पा पवळे, सुशिल पा पवार, संदिप पा कल्याण, सचिन कदम यांनी अडवल्याने या दौर्यांची प्रशासनाने चांगलीच धसकी घेतल्याचे दिसत होती.
COMMENTS