अतिवृष्टी पाऊसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पुजाताई मोरेनी पाण्यात जावून केली पाहणी शेतपिकांचे आतोनाक नुकसान झाले

--------------------------- मादळमोही, दि.१३ (संतोष भारती) :- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये परतीचा पाऊस जोरदार पडल्यामुळे शेतपिकांचे आ...


---------------------------


मादळमोही, दि.१३ (संतोष भारती):- बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये परतीचा पाऊस जोरदार पडल्यामुळे शेतपिकांचे आतोनाक नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पाहणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गेवराई तालुक्यात सुरू आहे. दि.१५ आँक्टोबर रोजी शेतकरी नेत्या पुजाताई मोरे यांनी कोळगांव ता गेवराई कापूस शेताच्या बांधावर जाऊन तसेच गुडघ्याभर पाण्यात जावून पाहणी केली. मोठ्या प्रमाणावर कापासाची फुटलेली बोंडे मातीमोल झालेले आहे.


       यंदाच्या वर्षी दि.१० आँक्टोबर पासून सुरू झालेल्या परतीच्या पाऊसाने बीड जिल्ह्यासह गेवराई तालूक्यात अतिवृष्टी मोठा स्वरूपात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची सर्व शेतपिके मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली आहे. सोयाबीन यासह सर्व पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या नुकसान झालेल्या पिकांची पाहणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि.१५ आँक्टोबर २०२० रोजी पुजाताई मोरे यांनी कोळगांव येथील शिवारातील अतिवृष्टी पाऊसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी बाजरी, कापूस शेताच्या बांधावर जाऊन तसेच गुडघ्याभर पाण्यात जावून पाहणी केली. मोठ्या प्रमाणावर सोयाबीन, शेंगा, तुर, कापासाची फुटलेली बोंडे मातीमोल झाली. अश्या व्यथा शेतकऱ्यांनी सांगितल्या. यावेळी सरसकट तातडीने पंचनामे करावी, ओला दुष्काळ जाहीर करून अनुदान, विमा मंजूर करून तात्काळ द्यावे असे मागणी करण्यात आली आहे.


जर प्रशासन लवकर जागे झाले नाही तर शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहेत. यावेळी मनसे नेते कृष्णा लोंढे कोळगांवकर, रमेश करांडे, पत्रकार बाळासाहेब घाडगे, संतराम जोगदंड, अंकुश खरात, आबासाहेब गवळी, जयदत्त बनसोडे, प्रविण करांडे, दिपक लोंढे, संदिप पवार, परमेश्वर करांडे, मच्छिंद्र कांबळे, दादा तळेकर, आदी शेतकरी उपस्थित होते.


चैकप


संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा..


-----------------------------------


शेतीचं नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला. पिक हाता तोंडाला येताच ते नष्ट व्हावे हे शेतकर्‍यासाठी खुपच वेदनादायक आहे. शेती भरोशाची राहिली नाही. पण मदत देतांना हात आखडता घेतला जातो, घोषणा लाखाच्या होतात, मात्र हातात तुंटपुंजा निधी पडतो हे गेल्या काही वर्षात दिसून आलेलं आहे. आता संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा. पिकविमा, हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत मिळावी. नसता मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर शेतकरी संघटनेकडून घेराव घालण्यात येईल असा इशारा देण्यात आला.



सरकार झोपलेल


----------------------


संपुर्ण महाराष्ट्राची परिस्थिताची कल्पना सरकारला आसतानाही सरकार गाढ झोपीचे सोंग करत आसलाचा आरोप संतप्त शेतकर्यांना कडुन केला जात आहे, तात्काळ नुकसान भरपाईची मागणी होत आहे


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group