‐---------------------------------
पालकमंञीा नामदार धनंजय मुंडे जरा लक्ष द्या.
----------------------------------
माजलगाव:-बीड जिल्ह्यातील विधवा निवृत्ती वेतन योजना ,अपंग निवृत्ती वेतन योजना, श्रावणाबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना,निराधार अनुदान योजना,राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेंतर्गत मागील पाच महिन्यांपासून लाभार्थ्यांना मानधनाचा लाभ मिळाला नसुन वंचित लाभार्थ्यांना तात्काळ मानधन वाटप करावे यासाठी बहुजन समाज पार्टी बीड जिल्हाध्यक्ष अॅड. अमोल डोंगरे यांनी बहुजन समाज पार्टी बीड जिल्ह्याच्या वतीने मा.तहसिलदार माजलगाव यांच्या मार्फत केंद्रिय सामाजिक न्यायविभाग मंञी थावरचंद गेहलोत व बीड जिल्हा पालकमंञी तथा सामाजिक न्यायविभाग मंञी महाराष्ट्र राज्य नामदार धनंजय मुंडे यांना निवेदन दिले. असे की,महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायविभाग मंञी तथा पालकमंञी बीड जिल्ह्याचे भुमीपुञ नामदार धनंजय मुंडे हे असुन या योजनेतील लाभार्थी हे आर्थिक विवंचनेत जीवन जगत असुन मरण यातना भोगतआहेत. तरी त्यांनी विधवा,अपंग,श्रावणबाळ,वृध्दापकाळ,अनुदान योजनेतील लाभार्थी यांचे मानधन तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करून प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याचे मानधन नियमीत द्यावे अशी मागणी बहुजन समाज पार्टी बीड जिल्हाध्यक्ष अॅड. अमोल डोंगरे यांनी केली.
यावेळी त्यांच्या सोबत माजलगाव विधानसभा अध्यक्ष,अरविंद लोंढे, बीड जिल्हा सचिव चंदनलाल बनगे, विधानसभा कार्यालयीन सचिव हरिभाऊ साळवे, विधानसभा सचिव जालिंदर साळवे हे उपस्थित होते.
COMMENTS