*
*केज प्रतिनिधी*
मागील काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे यासाठी संभाजी ब्रिगेड केजच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकाचे सोयाबीन, ऊस,मका,मूग,उडीद,कापुस पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना पंचनामे याद्या या सर्व भानगडीत न पडता सरसगट पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा लागू करून लवकरात लवकर वाटप करण्यात यावा यासाठी उद्या दि.22/10/2020 रोजी सकाळी 11 वाजता पासून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडच्या केज तालुक्याच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर तालुका अध्यक्ष राहुल खोडसे, संदीप शितोळे, किरण खोडसे,अंकुश मुळे, प्रेमकुमार खोडसे आदींच्या स्वाक्षरी आहेत
COMMENTS