====================================
केज प्रतिनिधी
केज तालुक्यात गत दोन दिवसांपासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच वीज पडून काही ठिकाणी जीवित हानी झालेली आहे. या सर्व घटनासह शेतीतील पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याच्या सूचना येथील पंचायत समितीच्या सभापती परीमळा विष्णू घुले यांनी तालुका प्रशासनाला केल्या आहेत. त्यांनी पत्रात पुढे म्हटले की गत दोन दिवसापासून केज तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. प्रामुख्याने सोयाबीन व कापूस या पिकांचे नुकसान झाले. अनेक पिकांना जागीच कोंब फुटले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तसेच हादगाव उमरी येथे वीज पडून जीवित हानी झालेली आहे. या दुर्घटना सह शेती नुकसानीचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत तसेच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी गतीने कार्यवाही करावी अशा सूचना येथील पंचायत समितीच्या सभापती परीमळा विष्णू घुले यांनी तालुका प्रशासनाला केल्या आहेत.
COMMENTS