*हिंगोली:जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांना पोलिस अधीक्षकांनी दिली तंबी*     *अवैध व्यवसाय चालकांचे धाबे दणाणले*

  जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली हिंगोली जिल्ह्यात चोरी घरफोडी गुन्ह्यातील संशयीत गुन्हेगारांना पकडून एलसीबी पथकाने पोलिस अधीक्षक रा...


 


जिल्हा प्रतिनिधी महेंद्र पुरी, हिंगोली


हिंगोली जिल्ह्यात चोरी घरफोडी गुन्ह्यातील संशयीत गुन्हेगारांना पकडून एलसीबी पथकाने पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या समोर सोमवारी हजर केले होते या गुन्हेगारांना कलासागर यांनी जिल्ह्यात चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये आढळून आल्यास याद राखा अशी तंबी दिली. पोलिस अधीक्षकांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारांसोबत अवैध व्यवसाय चालकांचे धाबे दणाणले आहेत.


विश्वसनीय सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार 


 जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये चोरी छूपे अवैध व्यवसाय सुरू होते. याशिवाय चोरी, घरफोडी या घटना देखील घडल्या आहेत. मात्र पोलिस अधीक्षक योगेश कुमार रुजू झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर अंकुश बसवला होता पण काही ठाण्या अंतर्गत गाव व शहरामधे चोरी छुपे अवैध धंदे सुरूच होते.या अवैध धंदेचालकांना खात्यातीलच काही अधिकारी कर्मचारी सहकार्य करत असल्याची चर्चा मध्यंतरी रंगली होती. अशा जमादार व ठाणेदार यांचे काँल डिटेल्स काढल्यास मोठे पितळ उघडे होऊ शकते.


दरम्यान पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांची बदली झाल्यानंतर हिंगोली पोलीस दलाचा पदभार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी हाती घेतला. नवीन पोलीस अधीक्षक आल्यानंतर जिल्ह्यात अवैध व्यवसाय खुलेआम सुरू होतील असा अंदाज बांधला जाऊ लागला होता. मात्र राकेश कलासागर यांनी मागील आठ दिवसात जिल्ह्याचा संपुर्णपणे अभ्यास केला. स्थानिक गुन्हे शाखा व इतर विभागामार्फत जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली.


त्यानंतर आज जिल्ह्यात चोरी व इतर गुन्ह्यांमध्ये असलेल्या अट्टल गुन्हेगारांना हजर करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्यावरून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांच्यासह पथकाने जिल्हाभरातील सुमारे ५० पेक्षा अधिक गुन्हेगारांना पोलीस अधीक्षकांन समोर हजर केले.


त्यानंतर पोलीस अधीक्षक कलासागर यांनी या गुन्हेगारांची चांगलीच हजेरी घेतली. या गुन्हेगारांची चांगली धुलाई करत जिल्ह्याभरात चोरीच्या घटनामध्ये आढळून आल्यास याद राखा अशी तंबीही दिली. पोलीस अधिक्षक कलासागर यांनी अट्टल गुन्हेगारांना चांगलाच हात दाखवला.त्यामुळे आता जिल्ह्यातील अवैध व्यवसाय सुरू होतील या आशेवर असलेल्या अवैध व्यवसाय चालकांचे धाबे दणाणले आहेत. तर आजच्या घटनेवरून पोलीस अधीक्षक कलासागर यांनीही आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. दरम्यान पुढील दोन दिवसात अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांवरही संक्रांत येणार असल्याचे बोलले जात आहे


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group