नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
गेल्या सहा ते सात महिन्या पासून देशासह राज्यात कोरोना विष्णूच्या संक्रमणाने अक्षरशः थैमान घातल्यामुळे विविध व्यवसायावर चांगलेच आर्थिक संकट कोसळले असतांना ही नायगांव तालुक्यातील मौजे कृष्णूर येथील रहिवासी असलेले मूर्तीकार माधव काशीनाथ कऊटकर यांनी दुर्गा महोत्सव जवळ येत असल्यामुळे आर्थिक चणचण दूर व्हावी म्हणून दुर्गादेवीच्या सुंदर अशा आकर्षक मुर्त्या बनवण्यात मग्न असल्याचे चित्र दिसून येत आहे
तालुक्यातील कृष्णूर येथे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर सदरील मुर्त्या घडवून रंगीबेरंगी रंग देऊन आकर्षक मुर्त्या दुर्गामातेच्या बनविल्यामुळे अनेक जन मुर्त्या पाहून जात असून मुर्त्या घडविण्याचे काम जोरात चालु असून सदरील व्यवसायाला कोरोना विष्णू वायरसमुळे चांगलाच फटका बसला असून कृष्णूर येथे गेल्या सात ते आठ वर्षा पासून सदरील व्यवसायाला सुरुवात करण्यात आली असली तरी यंदा चांगलाच आर्थिक फटका बसल्यामुळे व्यवसायकावर उपास मारीची वेळ आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
COMMENTS