राम दातीर
माहूर (प्रतिनिधी ) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माहूर शहरासह तालुक्यातील घरगुती वापरातील वीज बिल माफ करावे अशी मागणी विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता पंकज देशमुख यांना दि.13 ऑक्टो.रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदी घोषीत केल्याच्या कारणाने रीडिंग घेणारे कर्मचारी प्रत्यक्षस्थळी जाऊन रीडिंग घेवू शकले नसल्याने या कालावधी आकारलेली बिले अंदाजीत स्वरुपाची असल्याचा उल्लेख मनसेने आपल्या निवेदनात केला आहे. टाळे बंदी काळात सर्वच व्यवहार व कामकाज पूर्णतः बंद असल्याने रोज मजुरीवर निर्भर असलेल्या मंडळीवर उपासमारीची वेळ आल्याची व्यथा जाणून विद्युत वितरण कंपनीने माहूर शहरासह तालुक्यातील घरगुती वापरातील विज बिल माफ करण्याची विनंती दिलेल्या निवेदनातून केली आहे.त्या निवेदनावर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शेख असिफ, तालुकाध्यक्ष संदीप राठोड,तालुका उपाध्यक्ष सागर काण्णव ,तालुका सचिव प्रवीण जाधव,शहराध्यक्ष अक्षय परसवाळे,शहर उपाध्यक्ष वैभव जाधव,प्रसिद्धी प्रमुख राम दातीर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय आराध्ये,मनविसे तालुकाध्यक्ष सतीश राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यावेळी गणेश वर्मा,योगेश परसवाळे,यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती
COMMENTS