====================
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
.............................
नांदेड जिल्ह्याचे राजकीय व उद्योजक.शैक्षणिक क्षेत्रात ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वातुन विश्व निर्माण करुन एक कुटुंब प्रमुख म्हणून जे कौशल्य डि,बी.पाटील होटाळकर यांच्यात होते. त्यांच्यासोबत मला दिलखुलास चर्चा करायला आवडत असे.त्यांच्यातील प्रत्येक विषयाचा आभ्यास.जिद्द.अत्यंत मोलाचा होते अशी भावना नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील मौजे होटाळा येथील प्रसिद्ध उद्योजक डि.बी. पाटील होटाळकर यांचे पुणे येथे निधन झाल्यानंतर वार्यासारखी बातमी सर्वत्र पसरली असून या वेळी शहरांत विविध ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून आयोजित केलेल्या आदरांजली विचारपीठावर खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आ. राम पाटील रातोळीकर,मा.आ. लक्ष्मण ठक्करवाड, भाजपाचे श्रावण पा. भिलवंडे, बालाजी बच्चेवार,जि,प. सदस्य माणिकराव लोहगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा.चिखलीकर आपल्या भावना व्यक्त करताना पुढे म्हणाले की,
माझे व डि.बी.पाटील होटाळकर यांचे संबंध खुप दिवसाचे होते.ते राजकीय पेक्षा उद्योग व शैक्षणिक क्षेत्राची त्यांना आवड आसायची.आगदी मनमोकळ्या गप्पा.चर्चा.स्नेह व प्रत्येकाला आपुलकीने जेवन स्वतःआग्रहाने करायला लावणे हे फारच महत्त्वाचे गुण डि.बी.पाटील होटाळकर यांच्यात होते.माझी त्यांची फोनवरून परवापर्यत बोलणे झाले.मला वाटले होते कि ते दोन्हीही किडणी रिप्लेसमेन्ट वर मात करुन पुर्व जिवन सुरु झाले तसेच याही कोरोनावर ही मात करतील व त्यांनी केली सुद्धा पण आचानक तब्बेत बिघडली , यावेळी मात्र त्यांना शरिर साथ दिले नाही तेव्हा काळाने घाला घातला. होटाळकर कुटुंबाच्या दुःखात मि सहभागी आहे. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
-----चौकट----
डी बी पाटील होटाळकर यांची निधनवार्ता कळाल्यानंतर शहरातील विविध दुकाने,शाळा,कालेज सर्व बाजारपेठ बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी अशोक पा. मुगावकर,प्रा.मोहन चव्हाण, कोंडीबा पा. शिंदे, सुरेश पा. कल्याण, देविदास पा. बोमनाळे, प्रा. जीवन चव्हाण, शंकर पा.कल्याण रणजित देशमुख, रघुनाथ सोनकांबळे, भगवान लंगडापुरे, कैलास भालेराव,,गजानन चव्हाण, शंकर तमनबोईनवाड, जुनेद पठाण, सपोनि पाटेकर सपोनि कांबळे, माधव पा.कल्याण बाबुराव मामीङवार गोरठेकर लक्ष्मण मामीङवार प्रदिप देमेवार. राजकुमार सोनकाबळे. यासह व्यापारी, भाजपा कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी व नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
COMMENTS