-------------------------------------------------
केज प्रतिनिधी :- बीड जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पा पैकी एक असलेल्या मांजरा धरण हे ९८% टक्के भरले असल्याने आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे आणि आ. संजय दौंड यांच्या उपस्थितीत जलपूजन केले.
मांजरा नदीवर असलेले आणि बीड लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी असलेले मांजरा धारण हे परतीच्या पावसाने तुडुंब भरले आहे. हे धरण ९८.९८% एवढया क्षमतेने भरले आहे. चार वर्षात हे धरण पाहिल्याचं भरले असल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी दि. २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १:३० धनेगाव येथील मांजरा धरणावर जलपूजन केले. या वेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, विधान परिषदेचे आ. संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, दत्ता पाटील, तालुका अध्यक्ष नंदकुमार मोराळे, शिवाजी सिरसट, गुंडाप्पा भुसारी, पिंटू ठोंबरे, शिवाजी चौधरी, मुकुंद कणसे, शंकर उबाळे हे उपस्थित होते. यावेळी मांजरा प्रकल्पाचे अधिकारी आणि विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी हजर होते. दरम्यान यावेळी उपस्थितांची संवाद साधताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, चार वर्षात हे धरण भरले आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. याचा आनंद झाला आहे. असे ते म्हणाले
.
COMMENTS