नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
जनता हायस्कुल क. म. वि. नायगाव (बा) येथे कै. डी. बी. पाटील होटाळकर यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पवार कुटुंबियांना या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वराने बळ द्यावं अशी प्रार्थना ईश्वराकडे करण्यात आली. नायगांव पंचक्रोशीतील शिक्षण क्षेत्रातील एक नामवंत स्वच्छ मनाचा माणूस आज आपल्यातून हरवला आहे अशा भावना रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या. यावेळी जनता क. म. वि. चे प्राचार्य केशवराव सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रभाकर पवार, उपमुख्यद्यपक सा. रा. जाधव प्रा. बाबासाहेब शिंदे, प्रा. पी. डी. जाधव, प्रा. अनिल सूर्यवंशी, प्रा. गजानन शिंपाळे , प्रा. एम .एस. सोमवार, यशवंत चव्हाण ,शरद कदम,शरद जोंनकल्ले,बारडे सर, गंगाधर मिरकुटे, परमेश्वर वाघमारे ,लुटे सर , श्रीधर बेटमोगरेकर,यांच्यासह संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
COMMENTS