नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
कित्येक माणसं रिकामी हातांनी जन्म घेतात आणि रिकामी हातांनीच जातात पण आपल्या हयातीमध्ये विविध क्षेत्रात काम करून ज्यांनी अनेकांच्या ह्रदयात घर करुन जातात त्यांचे नाव मात्र अजरामर राहते असेच व्यक्तिमत्व नायगांव शहरातील गांधी नगर येथील आदर्श शिक्षक, उत्कृष्ट शेतकरी, सामाजिक व राजकीय क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून काम केलेले पिराजी गंगाराम शिरोळे यांच्या निधनानंतर विविध मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कै. पिराजी शिरोळे यांचे दिनांक 29 ऑक्टोबर 2020 रोजी अल्पशा आजाराने नांदेड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार गोवर्धन घाट सम्शान भूमीमध्ये करण्यात आले त्यांचा अस्थिकलश व श्रद्धांजली शोकसभेचा कार्यक्रम दिनांक ३१ ऑक्टोबर 2020 रोजी नायगांव येथे घेण्यात आला असून भाजपाचे सरचिटणीस श्रावण पा. भिलवंडे, बालाजी बच्चेवार, जि. प. सदस्य माणिकराव लोहगावे, शंकर पा.कल्याण यासह डॉ. माधव उच्चेकर, भगवानराव लंगंडापूरे, प्रा.जीवन चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे, सूर्यकांत सोनखेडकर, राजेश लंगडापुरे, रणजित देशमुख आदी जणांनी आपल्या भावना व्यक्त करून कै. पिराजी शिरोळे गुरुजीच्या कार्याला उजाळा दिला. यावेळी नगरसेवक देविदास बोमनाळे, गंगाधर कल्याण, माधव पा. कल्याण, पांडू पाटील कल्याण, चंद्रकांत चव्हाण, शंकर तमन् बोईनवाड, संजय चव्हाण, सतीश लोकमानवार, शिवाजी वडजे, सुरेश कदम, व्यंकट चव्हाण, राजेश आनेराये पहेलवान यासह विविध स्तरातील कर्मचारी, शिक्षक वृंद व शिरोळे कुटुंबीय सदस्य यांची उपस्थिती होती.शेवटी कवी व पत्रकार माधव बैलकवाड यांच्या कवितेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब पा. मुदखेडे यांनी केले.
COMMENTS