*नायगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न*..

नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )              राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक अविनाशजी आदिक व रवींद्र जी तौ...


नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )


             राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक अविनाशजी आदिक व रवींद्र जी तौर यांच्या उपस्थितीत नायगांव व बिलोली तालुक्याची आढावा बैठक जयराज पॅलेस नायगांव येथे घेण्यात आली. 


             या वेळी रा. यु. काँ. प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी सदर बैठकीचे प्रास्ताविक केले..या वेळी अविनाश जी आदिक व रवींद्र जी तौर यांनी पक्षाच्या संटनात्मक बांधणीसाठी योग्य ते मार्गदर्शन केले..सर्वांनी पक्षवाढीसाठी काम करावे अशा सूचना केल्या.. या वेळी नायगांव व बिलोली तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले..अविनाश जी आदिक व रवींद्र जी तौर यांनीही अत्यंत बारकाईने मनोगत ऐकले.तसेच या वेळी पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत तोंडी स्वरूपात तर काहींनी लेखी स्वरूपात मांडले..अविनाश जी आदिक व रवींद्र जी तौर यांनीही पदाधिकाऱ्यांच्या सर्व समस्या अडीअडचणी ह्या सर्वांची इत्यंभूत माहिती प्रदेश कार्यालयात तसेच मा.अजित दादा पवार साहेब व जयंत पाटील साहेब यांच्यापर्यंत पोहोचवणार असे सांगितले..


           राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते मा. कमलकिशोर कदम साहेब, मा.शंकर अण्णा धोंडगे साहेब, मा.प्रदीप जी नाईक साहेब, यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करणार, पक्षाची ध्येय धोरणे तळागळातील लोकांपर्यंत पोहचवणार असे मत रा.यू. काँ.प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, रा. काँ. पक्षाचे नायगांव तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे, रा. काँ. पक्षाचे बिलोली तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले..


            तसेच नायगांव व बिलोली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी आघाडी, युवक आघाडी, महिला आघाडी, सामजिक न्याय आघाडी, सेवा दल आघाडी च्या प्रमुखांनी सुद्धा पक्ष संघटना बांधणी बद्दल आपले मत व्यक्त केले ..सदर बैठकीचे आयोजन रा.यू. काँ.प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, रा. काँ. पक्षाचे नायगांव तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे, रा. काँ. पक्षाचे बिलोली तालुकाध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर यांनी केले..


‌ या वेळी बिलोली येथील मा. उपनगराध्यक्ष गौसोद्दीन कुरेशी, पंचायत समितीचे मा. सभापती पांडवे साहेब, मा. पंचायत समिती सदस्य लक्ष्मणराव देगलुरे, युवक तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे, मा. उपनगराध्यक्ष तथा विधानसभा अध्यक्ष आनंद गुडमलवार, नगरसेवक अनुप अंकुशकर, युवक जिल्हा सरचिटणीस संतोष उत्तरवार आणि नायगांव येथून राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष मारोती कदम कुंटुरकर, विद्यार्थी तालुकाध्यक्ष व्यंकट शिंदे, नर्सी ग्रामपंचायत सदस्य तथा पक्षाचे तालुका उपाध्यक्ष गजानन कोरे, पक्षाचे तालुका सरचिटणीस श्याम चोंडे, ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते दिलीप वाघमारे, राष्ट्रवादी युवक चे विलास पाटील धुप्पेकर, युवक तालुका उपाध्यक्ष राजेश ढगे, रा.यू. काँ. जिल्हा सचिव विलास पाटील, गजानन पवार, राष्ट्रवादी किसान आघाडीचे लक्ष्मण भवरे, घुंगराळा ग्रामपंचायत सदस्य मुरहारी तुरटवाड, श्याम यमलवाड, गंगाधर ढगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel