केज (प्रतिनिधी)- केज तालुक्यातील आनंदगाव सा. येथील येडेश्वरी कारखान्याचा ७ वा गळीत हंगामाचा शुभारंभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा येडेश्वरीचे चेअरमन बजरंगबप्पा सोनवणे यांच्या हस्ते झाले. सुरुवातीस काटापूजन,गव्हानपूजन पारंपारिक पध्द्तीने सामाजिक कार्यकर्ते गंगाधरभाई थावरे,नारायण घुले, यांच्या हस्ते करून सर्व मान्यवरांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली.
या शुभ प्रसंगी राष्ट्रवादीचे जेष्ठ नवाब मामू सय्यद, जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे, जेष्ठ संचालक कल्याण शिनगारे, श्रीधर भवर, बाळकृष्ण भवर, खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब बोराडे,विलास जोगदंड,भागवत सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे. युवक तालुकाध्यक्ष मुकुंद कणसे,हिंदी भाषिक सेलचे जिल्हाध्यक्ष शरीफ सय्यद, पंचायत समिती सदस्य नारायण शिंदे,शिवाजी चौधरी, दत्तात्रय ठोंबरे, गुंडाप्पा भुसारी,प्रेमचंद कोकाटे, व सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक बाळकृष्ण भवर यांनी केले यावेळी त्यांनी सर्व खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधीक्षक लक्ष्मण शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन अरुण चव्हाण यांनी मानले.
COMMENTS