महाराष्ट्रात उद्योजकता विकास करण्यासाठी या केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
नवीन उद्योजकांना प्रशिक्षण, भांडवल साठी मदत,बाजार पेठ मिळवून देण्यासाठी हे केंद्र सतत प्रयत्नशील असते.
उद्योग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना सल्लागार समिती सदस्य म्हणून नेमणूक केंद्र करत असते.लाखो उद्योजक या केंद्राने आज पर्यंत तयार केले आहेत. सध्याच युग हे माहिती तंत्रज्ञान वापरून उद्योग विकासाचं आहे,या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी उद्योजक श्री दिपक मोरताळे यांची निवड सल्लागार समिती सदस्य म्हणून केंद्राने केली आहे.
आपला भाग कृषी प्रक्रिया उद्योगासाठी अत्यंत अनुकूल असून त्या कृषी उद्योगाला जर माहिती तंत्रज्ञानाची सांगड घातली तर प्रत्येक उद्योग यशस्वी होऊ शकतो असे श्री दिपक मोरताळे यांनी सांगितले.तसेच या भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन मिरचीचे क्लस्टर उभारण्यात येणार आहे. माळाकोळी भागातील शिल्पकारा सोबत भारतातील एकमेव शिल्प क्लस्टर उभारण्यात येणार आहे. माझ्या ज्ञानाचा,समाजसेवेचा व अनुभवाचा फायदा मराठवाड्यास झाल्यास माझे जीवन सार्थक झाले असे मी समजेल श्री दिपक मोरताळे यांनी सांगितले.
COMMENTS