केज/येळंब सुभद्राबाई पुंडलिकराव वंजारे वय ८० रा .येळंब (घाट) ता जि.बीड यांचे दिनांक २९/१०/२०२० रोजी अल्पशा आजराने दु:खद निधन झाले. माजी...
केज/येळंब
सुभद्राबाई पुंडलिकराव वंजारे वय ८० रा .येळंब (घाट) ता जि.बीड यांचे दिनांक २९/१०/२०२० रोजी अल्पशा आजराने दु:खद निधन झाले.
माजी ग्रामसेवक पुंडलिक भाऊ वंजारे यांच्या त्या पत्नी तर माजी जि.प.सदस्य तुकाराम आण्णा वंजारे यांच्या त्या भावजई होत्या.
त्यांच्या पश्चात त्यांना तिन मुले आहेत.
राजु वंजारे, व्यवस्थापक, जिव्हाळा बेघर निवारा केन्द्र चालवतात. राहुल वंजारे हे रिलायन्स कंपनी मधे नौकरीस आहेत तर गौतम वंजारे माध्यमिक शिक्षक आहेत.
दोन मुली पुष्पा , विशाखा, जावई , सुना नातवंडे व येळंब येथे एकत्रित कुटुंबातील सर्व सदस्य असा मोठा परिवार आहे. सुभद्राबाई वंजारे यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळा असून येळंब , बीड, केज परिसरातील नातेवाईक, हितसंबंधीनी वंजारे कुटुंबाचे सांत्वन केले आहे.
COMMENTS