*
धर्माबाद (अहमद लड्डा) शहरातील नावाजलेल्या संस्कार कोचिंग अकॅडमीने दरवर्षीप्रमाणे याही व र्षी 2019 - 2020 या शैक्षणिक वर्षात शालेय स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता कायम ठेवली आहे. शालेय शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मधून शैलेश सोमदत्त सीतावार ( प्रथम 204 ) , निधी विजयकुमार मानधनी ( 182 द्वितीय) ,उत्कर्षा शिंदे (168), नक्षत्रा राजुरे ( 156) आणि इयत्ता पाचवी मधून वाघमारे सम्यक निलेश (200 प्रथम) , मंगनाळीकर शरयू (182) द्वितीय आली आहे. नागेश कोँचमवाड, रेणुका कदम , शिवम होट्टे,आयुष् वारले, विवेक मोकेवाड , मयंक पाटील , मनस्वी निलावार , स्नेहा वारले इ. तसेच या परीक्षेसाठी एकूण 15 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता त्यातील 13 विद्यार्थी पात्र झाले आहेत त्यांच्या या यशाबद्दल समाज आणि पालक वर्गातून कौतुक होत आहे. या यशाबद्दल *संस्कार अकॅडमी* चे संचालक श्री गंभीरे सर ,सौ वर्षा गंभीरे मॅडम , मनुरकर मॅडम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे .
COMMENTS