धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलने आपल्या यशाची उज्वल परंपरा कायम राखून फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे .
पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी मधून एकूण परीक्षार्थी 16 विद्यार्थी पात्र ठरले आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवी तुन 14 विद्यार्थी यशस्वी झाले.
या परीक्षेत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी कु. गायत्री पाटील 228 गुण ,सोहम कदम 222 गुण मिळविले .
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता आठवीतून कु. महादेवी हाळे 250 गुण, कु. शिवगंगा मठवाले 222 गुण, घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले . सर्व विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक धर्माबाद परिसरात होत आहे .
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, बन्नाळीकर सचिव विश्वनाथ पाटील बन्नाळीकर , सहसचिव सुरेश गंजेवार ,कोषाध्यक्ष रामचंद्र माधवराव पाटील बाळापूरकर, विश्वस्त मंडळ तसेच संचालक मंडळ व गटशिक्षणाधिकारी गोडबोले साहेब ,केंद्रप्रमुख आंदेलवाड साहेब विद्यालयाचे मुख्याध्यापक गंगाधर पवार, उप. मु.अ. स.का. बेंबरेकर, पर्यवेक्षक गायकवाड रामेश्वर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी कौतुक केले.
COMMENTS