धर्माबाद (अहमद लड्डा) आमदार राजेश पवार व मी जनतेसाठी, जनतेच्या कल्याणासाठी जे काही करीत आहोत ते वेगळे काहीच नाही हे आमचे कर्तव्यच असून पूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी जे आजतागायत काहीच केले नाही तेच आम्ही करीत आहोत, जे घटनेत लिहिले आहे त्याचीच पूर्तता आम्ही करीत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेतील आमदार वा लोकप्रतिनिधी कसा असावा या गोष्टीस पात्र ठरण्याचा प्रयत्न करून मतदारसंघाचे पालकत्व काय असते हेच भविष्यात दाखवायचे आहे असे प्रांजळ प्रतिपादन आमदार राजेश पवार यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या सौ पुनमताई पवार यांनी तालुक्यातील नायगाव(ध) येथे केले. शेत शिवार भेट व त्या अनुषंगाने शेतकऱ्याची सुसंवाद साधणे या धरतीवर त्या काल धर्माबाद तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. मौजे ईळेगाव व बेल्लूर येथे नुकतेच नेत्र रोग निदान शिबिर घेण्यात आले होते, तेथे काल चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला व शेवटी नायगाव या तालुक्यातील शेवटच्या गावात शिवार भेट कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड, भाजपाचे माजी तालुकाअध्यक्ष विजय पाटील डांगे,माजी संचालक अशोक पाटील वडजे, माजी नगरसेवक गंगाधर गौड, हिंदू युवा संघटनेचे सतीश मोटकूल, नारायण पाटील पवार, शंकर पाटील कदम ,अमित मुंदडा, मेघनाथ पवार, माधव गाडे, साईनाथ , बालाजी सावरगाव, रामराव कदम, सोशल मीडियाचे मराठवाडा अध्यक्ष साईनाथ शिरपुरे,मंगळूरे पाटील चिंचोलीकर, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, व शेकडो शेतकरी उपस्थित होते. नुकत्यात केंद्रात पास झालेल्या शेतकरी विधेयकाबद्दल महाराष्ट्र शासन हे आपप्रचार करीत असून या संदर्भात पुनम ताई यांनी सखोल मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरपंच राजेश्वर सदनपोड यांनी केले शेवटी पिठलं भाकरी ठेचा असा जेवणाचा कार्यक्रमही यावेळी संपन्न झाला. माझा वाढदिवस असला तरी त्यानिमित्ताने गावातील किमान पाच प्रकरणे जे शासनदरबारी प्रलंबित आहेत ते कागदपत्रांच्या पूर्ततेसह माझ्याकडे आणून द्यावेत ते प्रकरणे निकाली काढू, यातच मला आपल्या शुभेच्छा मिळतील असे भावपूर्ण आवाहनही यावेळी केल्यामुळे सर्वांचीच मने भारावली.
COMMENTS