धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद जवळ असलेल्या रामेश्वर च्या ग्रीनफील्ड नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित फेब्रुवारी २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व-प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भरघोष असे यश संपादन केले आहे. या शाळेच्यां इयत्ता पाचवीचे 12 विद्यार्थी परीक्षेस बसले होते आणि या 3 पैकी विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. कु मधुरा माधवराव तांदळे ने 228 गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला आहे. प्रणव पंढरीनाथ खांडरे 182 गुण घेऊन दुसर्या क्रमांकावर असून कु रोहिणी यादवराव वाडेकर यांनी 124 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे. माध्यमिक विभागातुन इयत्ता आठवीचे 16 विद्यार्थी परीक्षेस होते आणि यापैकी दोन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. हिमेश बालाजी देवकरे यांनी 142 गुणांसह प्रथम आणि वैभव गंगाधर पवार यांनी 130 गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डी.बी. पाटील होटालकर, उपाध्यक्ष शिवराज पाटील होटालकर, प्राचार्य शेख खदीर व उपप्राचार्य साै प्रज्ञा इनामदार आणि सर्व शिक्षक व शिक्षकांनी सुभेच्छा दिल्या आहेत.
COMMENTS