हदगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांची हुकूमशाही@ * बातमी का लावली म्हणून पत्रकारावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी+

@ संतोष सुरोशे हदगाव तालुका प्रतिनिधी  हदगाव येथील पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी श्री केशव गड्डापोड यांनी बातमी प्रसारित का केली म्हणून ...

@


संतोष सुरोशे हदगाव तालुका प्रतिनिधी 


हदगाव येथील पंचायत समिती मधील गटविकास अधिकारी श्री केशव गड्डापोड यांनी बातमी प्रसारित का केली म्हणून दैनिक लोक जागृती हदगाव तालुका प्रतिनिधी यांची मानहानी करून खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.


सविस्तर वृत्त असे की दैनिक लोकजागृती या वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी अशोक गायकवाड यांनी दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी 'हदगाव पंचायत समितीकार्यालयाला सक्षम गटविकास अधिकारी मिळेल का? व ' हादगाव पंचायत समितीचा भोंगळ कारभार 'अश्या आशयाची बातमी प्रकाशित केली होती .त्या अनुषंगाने हदगाव पंचायत समितीत कार्यातील स्वच्छता व पाणीपुरवठा विभागातील श्री गुणवंत चव्हाण साहेब यांनी या बातमी संदर्भात आपण गटविकास अधिकारी श्री केशव साहेब यांच्याशी चर्चा करूत यासाठी दैनिक लोक जागृती या तालुका प्रतिनिधी अशोक गायकवाड यांना पंचायत समितीमध्ये बोलून घेतले आणि त्यांनी गटविकास अधिकारी साहेब यांच्या केबिनमध्ये येऊन गेले तेव्हा गटविकास अधिकारी साहेब म्हणाले की "तुम्हीच पत्रकार गायकवाड का? तुम्ही माझ्या विरोधात पेपरमध्ये बातमी का लावली? तरी माझे काही वाकडे होणार नाही? पत्रकार हे बातम्या पैसे घेऊन लावतात हे सर्व माहित आहे ?तसेच तुमच्यासारखे पत्रकार दगडाखाली भरपूर आहेत. त्यामुळे माझ्या विरोधात कितीही पेपर मध्ये बातम्या लावल्या तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही व तसेच तुझ्यावर मी खंडणीचा गुन्हा दाखल करू शकतो .असे म्हणत या पत्रकाराची मानहानी व इतर पत्रकाराची बदनामी करून खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न येथील गट विकास अधिकारी जाणून बुजून करत आहेत. त्यामुळे अशा मुजोर व हुकुमशाही वृत्तीच्या गटविकास अधिकारी यांच्याविरोधात महाराष्ट्र पत्रकार संघ व इतर पत्रकार यांनी या गोष्टीचा निषेध व्यक्त करून अशा मुजोर वकुं शाही गट विकास अधिकारी यांच्यावर कठोर व कडक कारवाई करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तहसीलदार साहेब हदगाव यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले या निवेदनावर अशोक गायकवाड , विकास राठोड ,जमील कुरेशी, राजेश मामिडवार,कैलास तलवारे,अँड. राऊत, संतोष सुरोशे, शुभम तुपकरी, संदीप वानखेडे, के, डी पवार, राजू हापसे, इत्यादी पत्रकारांच्या सह्या आहेत .परंतु लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारावर गटविकास अधिकारी अशा मोठ्या पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी पत्रकाराची बदनामी व मानहनी करणे अत्यंत दुर्दैवी व लाजिरवाणी घटना असून अशा ह्या हुकूमशाही वृत्तीच्या गटविकास अधिकारी हदगाव श्री केशव गडापोड त्यांच्यावर वरिष्ठांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी येथील पत्रकार यांनी केली आहे. परंतु वरिष्ठ व जिल्हाधिकारी गटविकास अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करणार ?याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group