राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )राज्यात शिवसेना,रा.कॉ.व कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात महीलावरील अन्याय/अत्याचाराचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारला पूर्णतः अपयश आल्याचा आरोप करून माहूर भाजपा महीला मोर्चाने आज दि.12 ऑक्टो.रोजी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांना निवेदन देवून राज्य सरकारचा निषेध केला.
राज्यात अनेक ठिकाणी महीलावर झालेले हल्ले, अन्याय/अत्याचार आणि ते रोखण्यात राज्यातील आघाडी सरकारला अपयश आल्याची बाब हेरून राज्यभर भाजपा महीला मोर्चाच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्याचे आयोजन करण्यात आले होते.त्याच अनुषंगाने माहूर भाजपा महीलाच्या पदाधिकारी पद्मजा जयंत गी-हे,नगरसेविका दीपाली लाड,अर्चना दराडे,नम्रता गायकवाड,अर्पणा पाटील,महानंदा मानतुटे यांचेसह तालुक्यातील अन्य महिलांनी निवेदन देवून राज्य सरकारच्या महीला विषयक धोरणाचा निषेध केला.यावेळी पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.अण्णासाहेब पवार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
COMMENTS