धर्माबाद-(अहमद लड्डा)
पोलीस स्टेशन धर्माबाद येथे डेबेकर सुरेश लक्ष्मण रा.बाळापुर
,अनिल भोजराम बन्त्र बन्नाळीकर रा.समता नगर धर्माबाद व आकाश गंगाधर बोमलवाड
रा.शंकरगज धर्माबाद यांची सैन्य दलात जे.डी.पदावर निवड झाली असुन ते मुलभुत
प्रशिक्षणासाठी बेळगांव,बेगलूरु,बिहार येथे जाणार असल्याने पोलीस स्टेशन धर्माबाद च्या
वतीने पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित
केला होता.
सदरचे तिन्ही उमेदवार हे गरीब कुंटुंबातील असुन गेल्या दीड वर्षापासुन लाल बहादुर
शास्त्री महाविद्यालय धर्माबाद च्या कवायत मैदानात राजमुद्रा स्पोटर्स कल्बच्या माध्यमातुन सैन्य
भरतीचा दररोज सराव करीत होते.त्यांची निवड यादी मार्च २०२० मध्ये झाली परंतु कोरोना
१९ या रोगामुळे प्रशिक्षणास उशिरा जात आहेत असे प्रास्ताविक पोलीस नाईक
बालाजी नागमवार यांनी केले.तिन्ही उमेदवारानी मेहनतीने व कष्ठाने हे पद मिळवून ते देशसेवेसाठी जात आहेत ही आभिमानास्पद बाब आहे,
भविष्यात सुध्दा धर्माबाद तालुक्यातील जास्तीत जास्त युवकांनी मेहनत करुन देशसेवेसाठी
सैन्य दलात भरती व्हावे,त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास मदत व मार्गदर्शन
करण्यास मी तयार आहे राष्ट्रीय सेवाकार्य करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन पो.नि.सोहन माछरे यांनी अध्यक्षीय भाषनात केले.
सदर कार्यक्रमास पोलीस स्टेशनचे पोउपनि गणेश कराड, सपोउपनि साहेबराव नल्लेवाड,
पोलीस हवालदार मनोज मसलेकर,चंपत कदम,सदानंद आकुलवार, बालाजी जाधव,पोलीस
नाईक मो.अलीम,पंडीत कल्याणकर,बालाजी बोडके,पोलीस शिपाई दत्ता ढगे,संतोष
घोसले,शे.फिरोज धर्माबाद शहरातील प्रमोद बोईनवाड उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे
सुत्रसंचालन सुधाकर चिलकेवार यांनी केले.
COMMENTS