उमेद "अभियान बाह्य संस्थेकडे वळविल्यास सीटू राज्यभर आंदोलन करणार ! नांदेड येथील मोर्चात सीटूची घोषणा.

    " उमेद "अभियान   नांदेड - ' उमेद' अभियानातील अधिकारी - कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती व नुतनीकरण करा ! ही मागणी घेऊन सीटू...

 


 


" उमेद "अभियान


 


नांदेड - ' उमेद' अभियानातील अधिकारी - कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती व नुतनीकरण करा ! ही मागणी घेऊन सीटू च्या नेतृत्वाखाली नांदेड येथे भव्य मुक मोर्चा दि.12 अॉक्टोबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आला.


*उमेद अभियानातील* मागील दहा वर्षात अभियानाने आखून दिलेले टप्पे पूर्ण करीत अभियान आता उपजीविका साधनांच्या बळकटी च्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे ही बाब लक्षात घेऊन जागतिक बँकेने मागील कालावधीचे मुल्यांकन करून अभियानाचे ठरवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे आणि पन्नास लाख महिलांच्या जीवनोन्नती चा मार्ग खडतर केला आहे. पुनर्नियुक्ती व नूतनीकरण न करण्याच्या धोरणामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. भारतातील सर्वात मोठे केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान संपविण्याचा घाट विद्यमान सरकारने घातला आहे. अभियानाची यशस्वी अंमलबजावणी सुरू असतानाच आणि ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढीच्या टप्प्यावर आले असतानाच सरकारला अंधारात ठेवून काही वैयक्तिक स्वार्थापोटी इतके मोठे पाऊल उचलले जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने अभियानातील सुमारे पन्नास हजार कर्मचारी संकटात सापडले आहेत. त्यामुळे अभियानाला जोडलेल्या पन्नास लाख महिलांच्या जीवन उन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. दरम्यान चारशे कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. उमेद अभियाना मध्ये जवळपास पाच लाख बचत गट, ग्रामसंघ व प्रभाग संघ राज्यभर उभे झाले आहेत. यात पन्नास लाखांपेक्षा जास्त महिला जोडल्या गेल्या आहेत. देशामध्ये अनेक अभियाना चे नूतनीकरण करून पुढे सुरु ठेवण्यात आली आहेत परंतु हे उमेद अभियान बाह्य संस्थेकडे वर्ग करण्यात आले तर सद्यस्थितीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक नूतनीकरण करार संपल्याचे जाहीर करून यापेक्षा कमी मानधनावर नवीन कर्मचाऱ्यांची भरती / नियुक्ती करण्याचे सर्व अधिकार त्या नवीन संस्थेकडे देण्याचे कटकारस्थान महाराष्ट्रात होत आहे.


तसे ढळढळीत उदाहरण म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक नुतनीकरण करार संपले अशा 450 कर्मचाऱ्यांना गेल्या महिनाभरात टाटकळत ठेवले,करार नुतनीकरण होईल,तुम्ही काम करीत रहा,असे सांगितले आणि नुकतेच आता एक परिपत्रक काढून कार्यमुक्त करण्याच्या सुचना देऊन सर्वांचे काम थांबविले.सोबतच पुढील करार पत्र राज्याला पाठवू नये अशा सुचना देऊन सर्वांना घरचा रस्ता दाखविला आहे.


जीवनोन्नती अभियानातील कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देणे बाबतच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सुचना दिल्या असून संपूर्ण राज्यभरात तात्काळ अमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे. तात्काळ अमलबजावणी करावी व उमेद अभियानातील सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी तसेच विनाविलंब नुतणीकरन करावे ह्या मुख्य मागण्या घेऊन सीटू जिल्हा कमिटीच्या वतीने दि. 12 आॉक्टोबर 2020 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सकाळी 11.00 वाजता मुकमोर्चा काढण्यात आला मोर्चा चे नेतृत्व सीटू चे नांदेड जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या कार्यालया समोर समारोप करण्यात आलेल्या मोर्चा कॉ.विजय गाभणे,कॉ.ॲड.प्रदीप नागापूरकर,कॉ.उज्वला पडलवार,कॉ.विनोद गोविंदवार,कॉ.मंजूश्री कबाडे यांनी मार्गदर्शन केले.


प्रहार चे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख आणि प्रा.कैलास येसगे यांनी मोर्चास पाठिंबा देत उमेद अभियानातील सदस्यांना न्याय मिळे पर्यंत सोबत राहणार असल्याची ग्वाही दिली.


भाकप युनायटेड चे कॉ.प्रा.ईरवंत सुर्यकार आणि कॉ.संतोष शिंदे , कॉ.शिवाजी फुलवळे,यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.मारोती केंद्रे,कॉ.दतोपंत इंगळे,राजनंदीनी चव्हाण,शमीम सुलताना,दिपमाला सुर्यवंशी,ज्योती ढवळे,शीला जोगदंड,क्रांती हाटकर,विशाखा,सोनसळे,संगिता वाघ,मीना कोकरे,मिरा क्षिरसागर,मंगल पाटील,कोमल पोहरे,पुजा नाईक,सुमन पचलिंगे आदींनी परिश्रम घेतले. 


 


नांदेड जिल्ह्यातील हजारो लोक उमेद अभियानाशी जोडलेले असून अभियान बंद पडले तर महिला अडचणीत येणार आहेत त्या मुळे नांदेड जिल्ह्यात मोठे जनआंदोलन ऊभे करणार असल्याचे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.आंदोलनात हजारो लोक सामील झाले होते त्या पैकी महिलांची संख्या लक्षनिय होती. 


 


 *कॉ.गंगाधर गायकवाड*


 


  जनरल सेक्रेटरी सीटू नांदेड जिल्हा कमिटी तथा राज्य कमिटी सदस्य महाराष्ट्र राज्य. मो.7709217188.


 


-------------------------------------


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group