माजलगाव-प्रतिनधी
शहरातील डॉ संजय जेथलिया यांचा मुलगा सौरभ जेथलिया याने 13 सप्टेंबर रोजी झालेल्या नीट च्या परीक्षेत 720 पैकी 662 गुण घेऊन देशात 1100 वि रँक मिळवली असून बायोलॉजी विषयात 360 पैकी 355गुण प्राप्त केले आहे.
सौरभ लातूर च्या राजश्री शाहू कॉलेज येथून 12 वि उत्तीर्ण असून आय आय बी क्लासेस चा लातूर येथील टॉपर आहे.12 वि नीट परीक्षेत विक्रमी यश संपादित करत सौरभ ने 662 गुण प्राप्त केले.त्याची लहान बहीण व चुलत बहीण भाऊ यांनी 10 वि परीक्षेत जुलै महिन्यात 100 पैकी 100 टक्के गुण मिळवले होते.शहरातील गौरी सत्यनारायण मुंदडा,रिद्धी श्यामसुंदर काकाणी व राजनंदिनी संतोष जेथलिया यांनी ही नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.त्यांच्या या यशाबद्दल माहेश्वरी सभेचे तालुकाध्यक्ष विनोद जाजू,तालुका सचिव उमेश जेथलिया,गोविंद बजाज, राध्येश्याम लोहिया,जुगलकिशोर झंवर,राजेंद्र इंदानी,जगदीश चांडक,रमेशचंद्र कासट,बालप्रसाद भुतडा,जीवन मुंदडा,प्रा कमलकिशोर लड्डा,रमेश बाहेती,दिलीप रारंधड आदींनी अभिनंदन केले
COMMENTS