भक्तांविना माहूर गडावर संपन्न झाली घटस्थापना.

       राम दातीर  माहूर (प्रतिनिधी )महाराष्ट्राच्या साडे तिन शक्ती पीठा पैकी एक व मुळपीठ असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात कोरोनाच्या पार्श्व...


       राम दातीर 


माहूर (प्रतिनिधी )महाराष्ट्राच्या साडे तिन शक्ती पीठा पैकी एक व मुळपीठ असलेल्या श्री रेणुकादेवी मंदिरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतिहासात प्रथमच भक्तांविना आज दि.17 ऑक्टो.रोजी स. 9 वाजण्याचे सुमारास रुद्राभिषेक, श्रीसूक्त व वेद मंत्राच्या पवित्र घोषात महाभिषेक संपन्न झाला.घटस्थापना हा आजच्या आश्विन शुध्द प्रतिपदेचा विशेष उत्सव.घटस्थापना म्हणजे शरीर रूपी घटां मध्ये उत्तम विचार,आचाराचे बीजारोपण करणे हे होय.आज स्त्री शक्तीच्या पूजनाचे विशेष महत्व आहे.त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या भगवती रेणुकेच्या गाभाऱ्यात महाअभिषेका नंतर षोडश उपचार पूर्वक घटस्थापना संपन्न झाली.तद्नंतर कु.आर्वी व कु.अन्वी तापडीया या कुमारीकांचे तसेच मयुरी पवन तापडीया या सुवासिनीचे पूजन व वेद पारायण करणाऱ्या वैदिकांचे यथासांग पूजन संस्थानचे अध्यक्ष तथा मुख्य जिल्हा न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी सपत्नीक केले. यावेळी सचिव तथा उपविभागीय महसुल अधिकारी कीर्तिकिरण पुजार उपाध्यक्ष तथा उपविभागिय पोलीस अधिकारी विलास जाधव,कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर,विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्ण्व, आशीष जोशी,अरविंद देव, दुर्गादास भोपी व सी.डी.पी.ओ.विशालसिंह चौहान यांची गाभाऱ्यात उपस्थिती होती.


     कुमारीका पूजन करीत असतांना चैतन्य स्वरूप असणाऱ्या प्रत्यक्ष रेणुकेचे पूजन सुरू आहे की,काय याची अनुभूती उपस्थितांना येत होती.आजचे कुमारीका पूजन म्हणजे भगवतीचे शैल पुत्रीचे स्वरूप होय.शास्त्रा मध्ये सांगितल्या प्रमाणे गांधार्व वेद म्हणजेच गायन कला ही भगवतीला अतीशय प्रिय आहे.म्हणूनच संगीत साधक दररोज नवू दिवस आपली सेवा भगवती चरणी सादर करतात. परंतु या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे धार्मिक विधी शिवाय कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. घटस्थापने प्रसंगी संकल्प सोडताना देश कोरोना मुक्त होवो, राष्ट्रच्या सुरक्षीततेसाठी अहोरात्र आपल्या सुरक्षेची जबाबदारी चोख पणे पार पडणाऱ्या सैनिकांना आरोग्य शक्ती प्रदान कर,बळी राजाला व रेणुका भक्तांना समृद्ध कर त्या॑चे भोवती रेणुका कवच राहू दे असे अध्यक्षांनी साकडे घातले.छबीना काढून परिसर देवता पूजना नंतर मातेला नैवद्य अर्पण केला.विविध पुरातन अशा स्वर्णालंकाराने भगवतीचे रूप सजविण्यात आले होते.या रूपाचे दर्शन घडल्याने आपण कृतकृत्य झाल्याचे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.आजच्या विधीचे पौरोहीत्य वेद पाठशाळेचे वे.शा.सं.विनायक फांदाडे व चंद्रकांत रिठे गुरुजी यांनी केले.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group