बळीराजा आधार एक हात मदतीचा या अभिनव उपक्रमाला सुरुवात
श्रीक्षेत्र माहूर
श्री रेणुका माता शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती माहूरच्या शिक्षण विभागाने 'बळीराजा आधार एक हात मदतीचा' हा अनोखा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांची दिवाळी समाधान कारक व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील माहूर तालुका शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याने महाराष्ट्रासह जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि संपूर्ण जगाचा पोशिंदा आहे निसर्गाची अनिश्चितता पावसाची कमतरता आर्थिक अडचणींमुळे अनेक शेतकरी कुटुंबांना संकटांचा सामना करावा लागत आहे
पुढे उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीत त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांनाही सन्मानाने दिवाळी साजरी करता यावी या उदात्त भावनेतून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत गरजू शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. 'एक हात मदतीचा' या संकल्पनेतून समाजातील दानशूर व्यक्ती आणि संवेदनशील नागरिकांनीही बळीराजाच्या मदतीसाठी पुढे यावे, असा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे. श्री रेणुका माता नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात धार्मिक उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत शिक्षण विभागाने समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली आहे. संकटातील शेतकऱ्यांना आधार देऊन त्यांच्या कुटुंबात आनंद निर्माण करण्याचा हा उपक्रम सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण ठरत आहे. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार, एस. एस. पाटील, काशीनाथ थोटे, संतोष मोहन चव्हाण, बालाजी येरमे, सुरोशे, मास्तुरे आदी उपस्थित होते. बळीराजाच्या कष्टांचा सन्मान करून त्यांची दिवाळी आनंदमय करण्यासाठी माहूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने राबविलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
बळीराजा आधार एक हात मदतीचा या अभिनव उपक्रमाला सुरुवात श्रीक्षेत्र माहूर श्री रेणुका माता शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती...
By Admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
विविध भाषांमधील लेखनसंहिता अन्य भाषेमध्ये अधिक सहजपणे भाषांतरित करणाऱ्या 'हॅन्डहेल्ड स्क्रिप्ट ट्रान्सलेशन डिव्हाईस' साठी स्वामी राम...
-
नरेंद्र येरावार उमरी. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील जाधव (आब्बा) यांची मं...
-
नरेंद्र येरावार पंढरपूर, दि. १३ - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सेवा करणाऱ्या...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
विविध भाषांमधील लेखनसंहिता अन्य भाषेमध्ये अधिक सहजपणे भाषांतरित करणाऱ्या 'हॅन्डहेल्ड स्क्रिप्ट ट्रान्सलेशन डिव्हाईस' साठी स्वामी राम...
-
नरेंद्र येरावार उमरी. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील जाधव (आब्बा) यांची मं...
-
नरेंद्र येरावार पंढरपूर, दि. १३ - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सेवा करणाऱ्या...
-
लोहा प्रतिनिधी, डॉ. आर. एम. पुरी व नागेश शिकरे यांच्या प्रयत्नांना यश लोहा तालुक्यातील मौजे रिसनगाव येथे विहिरीत पडलेल्या भारतीय अजगराची पश...
-
बळीराजा आधार एक हात मदतीचा या अभिनव उपक्रमाला सुरुवात श्रीक्षेत्र माहूर श्री रेणुका माता शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती...
COMMENTS