उमरी प्रतिनिधी-शेख आरीफ
उमरी:- बुरा मत देखो, बुरा मत सुनो, सोच अच्छी रखो या तिन्ही गोष्टी जर महिलांनी मनाशी बाळगून ठेवल्या तर आज प्रत्येक उद्योग क्षैञात पुरूषांच्या खांदा देऊन लघु उद्योगाकडे वळुन महिला सक्षम बनल्या शिवाय राहणार नाहीत असे प्रणिता शरद जोशी यांनी प्रतिपादन केले.
उमरीत आखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ अंतर्गत महिलांनी उद्योग कसे व कोण कोणते केले पाहिजे तसेच महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून महिलांच्या प्रशिक्षण शिबिरातुन माहिती देण्यात आले. शहरातील व ग्रामीण भागातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रणिता जोशी म्हणाले बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी वेगवेगळ्या व्यवसाय निवडायला पाहिजे. यामध्ये हळदी पासुन बुक्टीची पॅकिंग करणे,मिरची पावडर,मसाले, इलेक्ट्रॉनिक सामान,पापड, शेवया, अनेक प्रकारचे उद्योग उभारले तर त्यामधून चार पैसे मिळाले तर आपले कुटुंब सुखी समाधानी चालते असे सौ.प्रणिता जोशी म्हणाल्या यामध्ये घटोस्पोटित पिडित महिला, विधवा महिला, निराधार महिला स्वंताच्या पायावर उभे राहायचे झाले तर उद्योग शिवाय पर्याय राहिले नाही.असे जोशीताई म्हणाले.इलेक्ट्रॉनिक वस्तू कसे तयार केले पाहिजे ते बाजारात विकले तर चार पैसा जमवुन येतो त्यासाठी महिलांनी स्वताच्या पायावर उभे राहिले पाहिजे यासाठी मी आखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ अंतर्गत महिलांना कुठल्याही प्रकारच्या उद्योगासाठी अनेक मशनरी देऊन सहकार्य करु कोणतीही अडचण येऊ देणार नाही यांचे अश्वासन मेजर श्री.जाधव यांनी दिले. लघु उद्योग कसा केले पाहिजे यासाठी नांदेड येथील सौ.स्वाती कुलकर्णी यांनी सदर कार्यक्रमांचे आयोजन केले होतो.यावेळी डाॅ मनिषा तिवारी,श्रीमती प्रेमलता आग्रवाल, अर्चना शर्मा, स्वरा मराठे, नलिनी जोशी,काचावार मॅडम, मिरा तोताडे, नरेश तोताडे, राजेश कुलकर्णी, अनंत राखे,श्री.मावलगे, पञकार शंकर थेटे,आधी सह मोठया संख्येने महिला उपस्थित होते.
COMMENTS