माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय९१)यांचे आज पहाटे २.१५वाजता निधन.आज निलंग्यात अंत्यसंस्कार माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील ...
माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय९१)यांचे आज पहाटे २.१५वाजता निधन.आज निलंग्यात अंत्यसंस्कार
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून लातूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होता. त्यांना न्यूमोनिया झाला असून पुढील उपचारासाठी आज सकाळी पुण्यात हलविण्यात आले आहे.
निलंगेकर यांचे लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे त्यांचे वास्तव्य असून घरीच असताना त्यांना कफ झाल्यामुळे लातूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना न्यूमोनिया असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांची कोव्हीड चाचणी करण्यात आली. ज्यात ते पॉझिटिव्ह आले.
COMMENTS