नवी दिल्ली
ऐतिहासिक अशा अयोध्या येथील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आज पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण देशभरात उत्साह आहे. या सोहळ्याची एकंदरीत रूपरेषा काय असणार आहे ?ते जाणून घेऊयात…
राम मंदिर भूमिपूजन आज 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. शिलान्यास झाल्यानंतर राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल. आज सकाळी 8 वाजता भूमिपूजनाचा सोहळा सुरु होणार असून दुपारी 2 पर्यंत हा कार्यक्रम चालेल.
भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम दुपारी 12.30 ला सुरु होणार असल्याचा अंदाज आहे. राम मंदिराचे शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.40 ला पार पडेल. मंदिराचे पुजारी भूमिपूजनाची पूजा सांगतील. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत.
COMMENTS