दिंद्रुड प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस हद्दीत संशयास्पदरित्या झाडाला प्रेत लटकलेल्या अवस्थेत
आढळुन आल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी घडली.
शंकर गणपतराव थावरे वय ४८ वर्ष रा.पिंपळगाव नाखले असे मयत पुरुषाचे नाव असुन पिंपळगाव शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला प्रेत लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. प्रेत जमिनीवर अर्धवट लोंबकळत असल्याने मयत शंकर थावरे यांनी आत्महत्या केली की काही घातपात झाला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असुन दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ दाखल होत पंचनामा केला, प्रेताची उत्तरीय तपासणी साठी माजलगाव येथिल शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता मयत शंकर थावरे यांनी आत्महत्या केल्याचे सिध्द झाले असल्याचे दिंद्रुड पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.दरम्यान आत्महत्येचे कारण अस्पष्ट असुन दिंद्रुड पोलिस अधिक तपास दिंद्रुड पोलिस स्टेशन चे सपोनि अनिल गव्हाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
COMMENTS