धर्माबाद - (अहमद लड्डा) नांदेड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा आरोग्य सभापती सौ.पदमाताई सतपलवार यांचे खासगी धर्माबाद तालुक्याचे विशेष संपर्कअधिकारी म्हणून पत्रकार
सतिष पाटील शिंदे यांची निवड करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष प्रतिनिधी व शिवसेनेचे दमदार तालुका प्रमुख आकाश रेडी येताळकर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या येताळा गटातून घवघवीत विजय संपादन करून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झालेल्या सौ.पदमाताई सतपलवार यांची शिवसेनेचे नेते खासदार हेमंत पाटील व पालकमंत्री ना.आशोकराव चव्हाण यांच्या योग्य समन्वयाने जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा व आरोग्य सभापती म्हणून निवड करण्यात आली.
पहिल्यांदाच धर्माबाद तालुक्यास हा बहुमान प्राप्त झाला म्हणून धर्माबाद तालुक्यातील विकासात्मक कामांना चालना मिळावी व पूर्णवेळ काम सुरू रहावे या मुख्य हेतून तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व व पत्रकार सतिष पाटील शिंदे यांची खासगी विशेष जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली असून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा व आरोग्य सभापती यांच्याशी महत्वाचे काम असणाऱ्या नागरिकांनी सतिष पा.शिंदे यांच्या 7507115789,7522967641 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख आकाश रेडी यांनी केले आहे.
धर्माबाद तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी व इतर महत्वपूर्ण कामासाठी शहरात लवकरच शिवसेनेचे कार्यालय स्थापन करण्यात येणार असून त्या कार्यालयाची कार्यालयीन जबाबदारी देखील सतिष शिंदे यांच्याकडेच राहणार असल्याचेही यावेळी आकाश भाऊ रेडी यांनी सांगितले आहे.
COMMENTS