धर्माबाद (अहमद लड्डा) धर्माबाद तालुक्यातील सर्व पशुधन चे साथी च्या आजारापासून बचाव करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने लसीकरण मोहीम करण्याच्या कार्यक्रमास प्रारंभ करण्यासाठी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख श्री.संतोष पाटील मोरे धानोरकर यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनात त्यांनी पुढे असे लिहिले आहे की, पावसाळ्याच्या दिवसात विविध साथी चे आजार उदभवतात. म्हणूनच जर शेतकऱ्यांनी जनावरांची काळजी घेतल्यास भविष्यात साथी चे आजार होणार नाहीत, म्हणून शेतकर्यांनी जनावरांची काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्याच्या सुरूवातीस पशुधन ला विविध आजारांपासून बचावासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुसंवर्धन विभाग तर्फे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. घटसर्प, एकटांग्या, लाळ्या, खुरपूस, फ्याया, टोंडाफुरी आणि पायखुरी चे आजार होत असतात. विविध रोगांच्या संरक्षणासाठी, प्राण्यांना लहान आजारांपासून प्रतिबंधात्मक लस देत रहावे. असे न केल्यास साथी च्या आजाराने पशुधन मरण्याची शक्यता असते आणि पाळीव प्राण्यांच्या दुधावर देखील परिणाम होऊ शकते. म्हणून, प्राणी संवर्धन विभागाने जनावरांना उत्तेजन देण्यासाठी आपल्या हातांनी सहकार्य केले पाहिजे आणि गाय, म्हशी, शेळी, मेंडी आणि बैल जनावरांचे लसीकरण करून घ्यावे. तालुक्यातील पशुधनाला चालना दिल्याने त्याचा फायदा शेतकर्यांना होतो, या उद्देशाने जनावरांना पशुधनासाठी लसीकरण करणे आवश्यक झाले आहे. तालुक्यातील पशुधन ला साथीच्या आजारापासून त्वरित वाचविण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत लसीकरण करावे, असे निवेदन शिवसेनेचे उप तालुका प्रमुख श्री संतोष पाटील मोरे धानोरकर यांनी पशुसंवर्धन अधिकारी डॉ विलास गड्डेवाड यांना दिले आहे.
COMMENTS