प्रतिनिधी (परळी)
मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठ्यात विभाग आघाडी वर असली तरी जेवढे उदिष्ठ ठेवले होते तेवढे पीक कर्ज वाटप झाले नाही. त्यात बीड जिल्हा कर्ज वाटपात पिछाडीवर आहे . या बाबीकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री, आमदार यांचे सपशेल दुर्लक्ष असल्याचा आरोप शेतकरी संघर्ष समिती चे समन्वयक , शेतकरी नेते उत्तम माने यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील बँकांना यावर्षी 950 कोटी कर्ज वाटपाचे उदिष्ट ठेवण्यात आले होते.पण प्रत्येक्षात 434 कोटी 93लाख 4 हजार रुपये एवढे कर्ज आता पर्यंत वाटप झाले आहे याची सरासरी काढली तर 45.78% टक्के एवढे पिक कर्ज वाटप झाले आहे.
कर्ज माफी मिळाल्या नंतर खरिपाच्या पेरणी पूर्वी किवा वेळेत कर्ज मिळण्याची शेतकऱ्यांना अशा होती पण पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अपेक्षा वर पाणी फेरण्यात आले.
कर्ज माफी च्या निर्णय अमल बजावणीतील विलंबणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे .
या सारख्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नाकडे पालक मंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप ही त्यांनी केला आहे .
COMMENTS